चंद्रपूर-नागपूर महामार्गावर खासगी बस-ट्रकचा भीषण अपघात - Batmi Express

Be
0

चंद्रपूर-नागपूर महामार्गावर खासगी बस-ट्रकचा भीषण अपघात - Batmi Express,Chandrapur,Accident,Chandrapur Live,Accident News,Warora,Chandrapur News Live,C

वरोरा
:- चंद्रपूर-नागपूर महामार्गावर एका खासगी बसने दुभाजक ओलांडून चंद्रपूर बाजूने येणाऱ्या ट्रकला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनांचा समोरील भाग एकमेकांवर आदळला. यामध्ये दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू झाला असून १३ जण जखमी पावल्याची बातमी असून अनेक प्रवाशी गंभीर जखमी झाले आहे. गंभीर जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात स्थानांतरण होण्याची शक्यता आहे. ही घटना आज सायंकाळी 5.30 वाजता घडली.

नागपूर येथून हर्ष ट्रॅव्हल्स खाजगी क्र. एमएच 40 एटी 481 ही गाडी आज दुपारी सुमारे 40 प्रवाशांसह चंद्रपूरकडे निघाली. प्रवाशाने बसचालक साबीर शेख (वय 45, रा. चंद्रपूर) यांना बस सावकाश चालवण्याची विनंती केली. असे असतानाही तो भरधाव वेगाने गाडी चालवत होता. वरोरा येथील रत्नमाला चौकापासून सुमारे 300 मीटरवर बस येताच. त्याचवेळी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने अनियंत्रित बस महामार्गावरील दुभाजक ओलांडत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक क्रमांक एमएच 40 बीजी 9540 वर आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की बस आणि ट्रकचा समोरचा भाग केबिनमध्ये जाऊन आदळला. यामध्ये दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->