पेट्रोल, डिझेलसह गॅस सिलिंडरचे भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागत आहे. वाढत्या महागाईचा फटका आता ब्रेडला बसल्याने रोज सकाळी लागणारा नाश्तादेखील महागला आहे.
सँडविच, ब्रेड जॅम, ब्रेड बटर असाच अनेकांचा ब्रेकफास्ट असतो. ब्रेडचे बहुविध प्रकार अनेकांच्या आवडीचे असतात. मात्र आता ब्रेड खाणाऱ्यांच्या खिशावर परिणाम होणार आहे.
अशी झालीय नवीन भाव वाढ:
- अर्थात स्लाईस ब्रेडच्या किंमती आता 2 ते 5 रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत.
- सर्वच कंपन्यांच्या ब्रेडचे दर तब्बल 15 टक्क्यांनी वाढवण्यात आले आहेत.
- इंधन दरवाढ, गॅस दरवाढ या सर्वांचे थेट परिणाम ब्रेडच्या दरांवर झाले आहेत. ब्राऊ ब्रेडही 3 ते 5 रुपयांनी महागला आहे.
- देशात आलेल्या महागाईचे परिणाम आता थेट सर्वसामान्यांच्या खाण्यापिण्याच्या ताटावरही होताना दिसत आहेत.
- व्हिब्स, ब्रिटानीया यांसारखे ब्रेड आता महागले असून, आता 45 रुपयांचा ब्रेड 50 रुपयांवर पोहोचला आहे.
- मुख्य म्हणजे ब्रेड महागल्यामुळं त्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांवरही याचे थेट परिणाम होताना दिसत आहेत.
- त्यामुळं ब्रेड असणाऱ्या पदार्थांचे दरही निश्चितच वाढणार यात शंका नाही.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.