महिला वाहनामध्ये दबुन जागीच ठार
मुल:- ओडीसा वरून करीमनगर येथे कामानिमीत्य चारचाकी वाहन क्रं. ओ डी 03 एम 3197 ने जात असताना आकापूर जवळील मोळीवर चारचाकी वाहन पलटल्याने 1 महीला जागीच ठार झाली तर काही जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी पहाटे 4 वाजता दरम्यान घडली.
चंद्रपूर-गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील अनेक दिवसांपासुन सुरू आहे, मूल तालुक्यातील आकापूर जवळील काम काही दिवसापुर्वी पुर्ण झाले मात्र मोळीवर रिप्लेक्टर लावणे आवश्यक होते परंतु त्याठिकाणी रिप्लेक्टर लावण्यात आलेले नसल्याने रस्ता माहित नसलेल्या चालकांना रात्रोच्या वेळेस मोड असल्याचे दिसुन येत नाही. यामुळेच ओडीसावरून करीमनगर येथे चारचाकी वाहन क्रं. ओ डी 03 एम 3197 ने कामावर जाण्यासाठी निघालेल्या कामगाराचे वाहन पटली खाल्याने त्यात ओडीसा येथील एक कामगार महिला वाहनामध्ये दबुन जागीच ठार झाली, उर्वरीत कामागाराना मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. सदर वाहनामधुन 10 ते 12 कामगार करीमनगर कडे जात असल्याचे बोलले जाते
वाहनात दबुन असलेल्या महिलेला मूल पोलीस व नागरीकांच्या प्रयत्नातुन काढण्यात आले असुन उपजिल्हा रूग्णालयात नेण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.