पंढपुरात नात्याला काळिमा फासणारी घटना! सासऱ्याने सुनेशी केलं असं काही

Solapur,Pandharpur,Crime,crime news,rape,Rape News,Crime Live,Pandharpur Crime,

Solapur,Pandharpur,Crime,crime news,rape,Rape News,Crime Live,Pandharpur Crime,

पंढपुर
: मुल होत नसल्याने सासऱ्याने सुनेसोबत संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्याची नात्याला काळिमा फासणारी घटना सोलापूरमधील पंढरपुरातील ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. आपल्या मुलाकडून सुनेला मुलबाळ होत नसल्याने सासऱ्याने आपल्या सुनेशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलाय.

 (ads1)

Read Also: नागपूर - मोबाइल का बघतेस यावरून मुलींसोबत वाद; आईची आत्महत्या

प्रथमतः सासऱ्याने आपल्या सुनेचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ सुनेची नजर चुकवून आपल्या मोबाईलमध्ये शूट केला. तदनंतर सुनेला सदरील व्हिडिओ दाखवून सासऱ्याने व्हिडिओ व्हायरल करणार धमकी देत संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, सुनेने विरोध केल्याने तो वारंवार तिला ब्लॅकमेल करत असत. सदरील घडलेला प्रकार सुनेने आपल्या पतीला सांगितला. परंतु, घडलेल्या प्रकारावर पतीने आपल्या पत्नीची समजूत काढली. मात्र, सासऱ्याकडून ब्लॅकमेल करण्याचा प्रकार काही थांबेना. 

(ads1)

अखेर एके दिवशी सुनेने फोन करण्याच्या बहाण्याने सासऱ्याकडून मोबाईल घेऊन सदरील व्हिडिओ आपल्या भावाच्या मोबाईलवर पाठवला. त्यानंतर सुनेने तात्काळ पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. दरम्यान, सासऱ्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अटकही केली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.