गोंदिया: महिला काँग्रेसच्या प्रदेश महासचिव पदाचा शिला पटले यांनी दिला राजीनामा - Batmi Express

Be
0

Gondia,gondia news,Gondia Marathi News,Gondia Live News,Politics

गोंदिया: महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या महासचिव शिला पटले यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासोबतच महिला काँग्रेसच्या महासचिव पदाचा राजीनामा महिला प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांच्याकडे सोपवला आहे. राजीनामा पत्रात गेल्या 8 वर्षापासून आपण काँग्रेस पक्षात कार्यरत राहून तनमनधनाने काम केले. (ads1) मात्र पक्षात एक महिला व प्रदेश महासचिव म्हणून जो मान सन्मान मिळायला हवा होता तो मिळाला नाही, त्यातच तालुका, जिल्हा पातळीवर सुध्दा सातत्याने डावलण्याचेच काम करण्यात आल्याने महिलांना योग्य न्याय मिळत नसल्याचे लक्षात आल्याने महासचिव पदाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात सर्वच पक्षांमध्ये नाराजांची संख्या वाढताना दिसत आहे, तर या पक्षातून त्या पक्षात जाणार्‍यांची संख्याही वाढत आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->