गंभीर जखमीला पुढील उपचारासाठी नांदेडला हलविले ऐकून चौविस जखमी कळमनुरी ते आखाडा बाळापुर मार्गावर भीषण अपघात हिंगोली ते नांदेड मार्गावर पारडी मोड शिवारामध्ये ट्रक व खासगी बसचा भीषण अपघात झाल्याने तिघे जण जागीच ठार झाले असून या भिषण अपघातात चौविस प्रवासी जखमी झाले आहेत. यातील सहा प्रवाशी गंभीर जखमी असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. बुधवारी दि. २९ दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचे पोलिस विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
(ads1)
अपघातातील मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून जखमींना उपचारासाठी कळमनुरी, आखाडा बाळापूर, नांदेड येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेड येथून एक खाजगी बस (क्र. एम एच 38 एफ 8485) प्रवासी घेऊन हिंगोलीकडे येत होती. यावेळी कळमनुरी कडून आखाडा बाळापुर कडे जाणाऱ्या कंटेनरची खाजगी बस सोबत समोरासमोर धडक झाली.
अपघातात गंभीर जखमी अत्यवस्थ असल्याने मृत्यूची संख्या वाढण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. याबाबतची माहिती मिळताच कळमनुरी पोलिस ठाण्याचे पोलिसासह, आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक बालाजी पुंड, जमादार मधुकर नागरे, नागोराव बाबळे यांच्यासह कळमनुरी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
Read Also: कोरपना: पिकअपच्या धडकेत एक दुचाकीस्वार ठार
याशिवाय परिसरातील गावकरी घटनास्थळी एकत्र आले. पोलीस व गावकऱ्यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून चार रुग्णवाहिका द्वारे अपघातातील जखमींना उपचारासाठी कळमनुरी व आखाडा बाळापुर, नांदेड येथील रुग्णालयात पाठविले आहे.
कंटेनर उलटल्यामुळे त्याखाली सापडलेली दोन जणांचे मृतदेह जेसीबी द्वारे कंटेनर उचलून बाहेर काढण्यात आले. या अपघातामुळे कळमनुरी ते आखाडा बाळापुर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अपघातामध्ये तिघे जण ठार झाल्याची माहिती कळमनुरी पोलिस ठाण्याचे पोलिस सहा उपनिरीक्षक रोयलावार यांनी दिली आहे. घटनास्थळावरील परिस्थिती अपघाताची भीषणता दर्शवित आहे
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.