जिवती तालुक्यातील हिमायतनगर येथे सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागली आहे. या आगीत 30 क्विंटल कापूस जळून खाक झाला. दोन शेळ्यांनाही आगीत जीव गमवावा लागला. आगीने घरातील इतर वस्तूही खाक झाल्या आहेत. अंदाजे तीन लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
(ads1)
प्राप्त माहितीनुसार जिवती तालुक्यातील हिमायतनगर येथील दगडू आनंदा कासार यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. पाहता-पाहता आगीचा भडका वाढला. या आगीत घरात ठेवलेला 30 क्विंटल कापूस जळून खाक झाला. आगीत दोन शेळ्यांनाही जीव गमवावा लागला.
घरातील संसार उपयोगी साहित्य जळाले. आगीची माहिती मिळताच गावकरी धावून गेले. या आगीत अंदाजे तीन लाखांचे नुकसान शेतकऱ्याचे झाले आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.