TET Exam Scam : शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांची कारवाई सुरूच आहे. पुणे पोलिसांनी सौरभ त्रिपाठी नावाच्या व्यक्तीला लखनऊमधून अटक केली आहे. सौरभ त्रिपाठीची 'विनर' नावाची कंपनी आहे. या कंपनीने 2017 साली शिक्षण परिषदेचे परीक्षा घेण्याचे कंत्राट जी. ए. टेक्नॉलॉजी कंपनीला मिळवून देण्यासाठी लायझनिंगचे काम केले होते.
(ads1)
टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी आणखी काही जणांना टप्प्याटप्प्याने अटक होणार असल्याची माहिती पुणे पोलिसांनी मंगळवारी दिली होती. त्यानंतर आता लखनऊमधून सौरभ त्रिपाठीला अटक करण्यात आली आहे. टीईटी परीक्षेसाठीचे कंत्राट वर्ष 2017 ते 2020 पर्यंत जी. ए. टेक्नॉलॉजीकडे होते. त्यानंतर मागील वर्षी हे कंत्राट सौरभ त्रिपाठीच्याच विनर कंपनीला देण्यात आले आहे.
(ads1)
पुणे पोलिसांनी मंगळवारी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष सुखदेव डेरे आणि बंगळुरूमधून जीए टेक्नॉलॉजीच्या प्रमुख अश्विनकुमार यांना अटक केली असल्याची माहिती दिली होती. सुखदेव डेरे हे टीईटी परीक्षेच्या वेळी नियंत्रक होते. तर, जी.ए. टेक्नॉलॉजीकडे या परीक्षेचे कंत्राट होते.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.