कुलकुली परिसरात ६ हत्तीचे आगमन - Photo News Purpose
कुलकुली:- प्राप्त माहितीनुसार आरमोरी तालुक्यातील कुलकुली जंगल परिसरात रात्रौ 11 ते 12 च्या दरम्यान 6 हत्ती आढळून आले आहे. सदर हत्ती सालेभट्टी जंगलातून कुलकुली जंगल परिसरात येऊन चुडाळकडे गेले आहे.
हे नक्कीच वाचा: चंद्रपूर - तीन मुलांना सोडून आईचे प्रियकरासोबत फरार ; न्यायासाठी नवऱ्याची कैफियत
एकूण हत्तीची संख्या 6 आहेत. तसेच या हत्तींनी कुलकुली परिसरातील धानाचे पुंजन्याचे नुकसान केल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. हत्ती आल्याने कुलकुली येथील जनता रात्रभर जागून हत्तीच्या हालचाली वर लक्ष ठेऊन आहेत असे कुलकुली येथील सरपंच बावणे यांनी माहिती दिली आहे. वनविभागाला या घटनेची माहिती मिळताच वनविभागाची टीम त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन बारीक लक्ष ठेऊन आहे. .