#Drugs ड्रग्ज प्रकरणात अनन्या पांडेच्या घरी NCB चा छापा! - बातमी एक्सप्रेस

ड्रग्ज प्रकरणात अनन्या पांडेच्या घरी NCB चा छापा!,Drugs,Ananya Pandey News,NCB raids Ananya Pandey's house in drug case,Marathi News, Marathi Batmya

ड्रग्ज प्रकरणात अनन्या पांडेच्या घरी NCB चा छापा!,Drugs,Ananya Pandey News,NCB raids Ananya Pandey's house in drug case,Marathi News, Marathi Batmya
ड्रग्ज प्रकरणात अनन्या पांडेच्या घरी NCB चा छापा!

ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूडमधील आणखी एक मोठं नाव अडचणीत आलं आहे. अभिनेत्री अनन्या पांडेच्या वांद्रे येथील घरावर आज एनसीबीने छापा मारला. आर्यन खानच्या व्हाट्सॲप चॅट मध्ये एका अभिनेत्रीच नावं आलं होत. त्यांनतर चौकशीला आज हजर राहण्यासाठी अनन्याला एनसीबीने समन्स बजावले आहे.  ( NCB raids Ananya Pandey's house in drug case

एनसीबीच्या या कारवाईमुळे बॉलिवूडमधली आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनन्याची आज चौकशी झाल्यानंतर बरचं चित्र स्पष्ट होऊ शकतं. दुपारी दोन वाजता एनसीबीच्या कार्यालयात हजर राहण्यास अनन्याला सांगण्यात आलं आहे.

हि पण बातमी वाचा: अमिर्झा येथे बोळीत आढळला १५ वर्षीय तरुणीचा मृतदेह; घातपात की आत्महत्या ?

छापा मारल्यानंतर अनन्याच्या घरी शोध घेण्यात आला. यावेळी एक महिला अधिकारीही सोबत होती. अनन्याच्या घरी एनसीबीचं पथक धडकलं, त्याचवेळी शाहरुखच्या मन्नत बंगल्यावरही एनसीबीची टीम पोहोचली.

शाहरुखच्या मन्नत बंगल्यावर एनसीबीची टीम का पोहोचली? ते स्पष्ट होऊ शकलेलं नाहीय. आर्यन आणि अनन्या दोघेही परस्परांचे चांगले मित्र आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.