Maharashtra Bandh: आज ‘महाराष्ट्र बंद’; कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थिती?, जरूर वाचा! | Batmi Express Mumbai

"maharashtra bandh news today, maharashtra bandh news live, maharashtra bandh news in marathi, maharashtra bandh in thane, maharashtra bandh in pune,

"maharashtra bandh news today, maharashtra bandh news live, maharashtra bandh news in marathi, maharashtra bandh in thane, maharashtra bandh in pune, maharashtra bandh in nashik, maharashtra bandh in mumbai, maharashtra bandh 11 oct
Maharashtra Bandh -Sources by MT

Maharashtra Bandh:
लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या बंदला सकाळपासून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र बंदचा परिणाम मोठ्या प्रमाणात वाहतूकीवर होत आहे. मुंबईत बेस्ट, पुण्यातील पीएमपी व ठाण्यातील टीएमटी बस सेवांना या बंदचा फटका बसला आहे. तर अनेक जिल्ह्यांमध्येही याचा मोठा परिणाम पाहायला मिळतो.

मुंबई : काल मध्यरात्रीपासून आज सकाळी पहाटेच्या दरम्यान बेस्टच्या 8 बसगाड्या आणि भाडेतत्वावरील एका बसगाडीची तोडफोड करण्यात आली आहे. धारावी, मानखुर्द, शिवाजी नगर, चारकोप, ओशिवरा, देवनार, इनॉर्बिट मॉल अशा विविध भागात या तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत.

Read Also: चिंचोली: वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू

सांगली : महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, दैनंदिन व्यवहार बंद करण्यात आले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून शहरात केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने सुरू असून याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे.

औरंगाबाद : महाराष्ट्र बंदच्या हाकेनंतर गुलमंडी भागात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. सातारा, देवळाई, उल्कानगरी, शिवाजीनगर परिसरात बंदला संमिश्र प्रतिसाद असून जीवनावश्यक साहित्याची दुकाने वगळता इतर व्यवहार बंद आहेत. 

अहमदनगर : अहमदनगरमध्ये 'महाराष्ट्र बंद'ला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. तर बाजार समितीत व्यापारी आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. तर 

अनेक ठिकाणी नागरिकांची वर्दळ पाहायला मिळत आहे.  

नागपूर : नागपूरमध्ये विविध भागात काँग्रेस राष्ट्रवादी पार्टी तर्फे आंदोलन करण्यात आले. बाईक रॅलीसुद्धा काढण्यात आली. मात्र, व्यापाऱ्यांची या आंदोलनाला पाठ दाखवली आहे.

 Read Also: नागपूर हादरलं!  नागपुरात 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

अकोला : अकोला जिल्ह्यात देखील महाविकास आघाडीने बंदच आवाहन केलं आहे. दरम्यान, अकोला शहरात मात्र या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. अकोला शहरात बसेस सुद्धा चालू आहे. बसस्थानकावर नागरिकांची वर्दळ पाहायला मिळाली आहे. 

परभणी : महाविकास आघाडीच्या बंदला परभणीत संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळतो. अनेक दुकाने उघडी असून काहींनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली आहेत. तर महाविकास आघाडीकडून दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

जालना : जालना जिल्ह्यातही बंद ठेवण्यात येत असून जालना शहरातील मामा चौकातून महाविकास आघाडीच्यावतीने घोषणाबाजी करीत फेरी काढण्यात आली. या बंदमध्ये व्यापाऱ्यांनी सहभागी होऊन बंदला पाठिंबा द्यावा यासाठी आज जालन्यात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांनी शहरातून मोर्चा काढला. 

अमरावती : अमरावती जिल्ह्यात देखील महाविकास आघाडीने बंदच आवाहन केलं आहे. दरम्यान शहरात मात्र या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. शहरात बसेस सुद्धा चालू आहे. बसस्थानकावर नागरिकांची वर्दळ पाहायला मिळाली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.