ब्रम्हपुरी: ब्रम्हपुरी तालुक्यात एक तर ग्रामीण मध्ये दोन अवैध दारू वाहतुकदारास अटक, एकूण 2 लाख 60 हजाराचा मुद्देमाल जप्त - Batmi Express Chandrapur

Chandrapur News,Bramhapuri News,Marathi News,News,Latest News in Marathi,Chandrapur Marathi News,Batmi Express

Chandrapur News,Bramhapuri News,Marathi News,News,Latest News in Marathi,Chandrapur Marathi News,Batmi Express
ब्रम्हपुरी तालुक्यात एक तर ग्रामीण मध्ये दोन अवैध दारू वाहतुकदारास अटक

ब्रम्हपुरी
: ब्रम्हपुरी पोलिसांनी दिनांक 1/10/2021 ला केलेल्या अवैध दारूच्या वाहतुकीच्या वेगवेगळ्या छापेमारीच्या कारवाईत रु. 2,60,600 चा मुद्देमाल जप्त करण्यात आले. ब्रम्हपुरी न.प. अंतर्गत कुर्झा वार्डातील झाशी राणी चौकातील आरोपी क्रिष्णा सुनील करंबे वय 24 वर्ष यास त्याच्याकडील ऍक्टिवा मो.सा. क्र. MH 49 Z 1589 वरून एका चुंगळीतुन रॉकेट देशी दारू संत्रा कंपनीची देशी दारूचे 05 बॉक्स अवैधरित्या वाहतूक करतांना मिळून आला, त्यांचेकडून रु.1,00,000 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ( one-illegal-liquor-transporter-arrested-in-bramhapuri-taluka-and-two-in-rural-areas

हेही वाचा: सिंदेवाही: एक विज कोसळली अन् बोकडांसह २६ शेळ्या जागीच ठार 

दुसरी कारवाई तालुक्यातील नांदगाव (जानी) हनुमान चौक येथील रहिवाशी असलेले आरोपी चेतन केवळराम सहारे यास त्याच्याकडील बजाज पल्सर  मोटारसायकल क्र. MH 34 AF 8254 वरून एका चुंगळीमध्ये रॉकेट देशी दारू संत्रा कंपनीची देशी दारूचे 04 बॉक्स अवैधरित्या वाहतूक करतांना मिळून आला त्याचेकडून रु.90,000 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हेही वाचा: सोयाबीन तोडणीसाठी जात असलेला मजुरांचा टेम्पो उलटला, एका महिला ठार, 10 जण जखमी

तिसरी कारवाई तालुक्यातील मेंडकी येथे आरोपी अंबरसिंग बच्चनसिंग दुधानी वय 35 वर्ष रा.  कपाळमेंढा हा त्याचे मोटारसायकल क्रमांक MH 34 BA 6327 वरून अवैध दारूसाठा वाहतूक करतांना मिळून आला. त्याचे ताब्यातून मोटारसायकलसह  अवैध दारू रु. 30600 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वरील तिन्ही कारवाईत एकूण रु.2,60,600 चा मुद्देमाल जप्त करण्यात येऊन तिन्ही आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम  65 अ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. सदरची कारवाई ब्रम्हपुरी  पोलीस विभागाच्या विशेष पथकाद्वारे करण्यात आली. हेही वाचा: चंद्रपूर शहरातील बस स्थानक परिसरात युवकाच्या अंगावर वीज पडून मृत्यू

जिल्ह्यात दारूबंदी उठविल्यानंतर ब्रम्हपुरी तालुक्यात ग्रामीण भागात अवैध दारूचा पुरवठा वाढला आहे, त्यामुळे पोलीस विभागाकडून गस्त व छापेमारीची विशेष मोहीम राबविली जात आहे. याचा परिणाम गेल्या महिनाभरापासून अवैध दारू पुरवठादार व विक्रेते यांच्यावर केलेल्या कारवाईत लाखोंचा मुद्देमाल जप्त करीत आरोपींना अटक करण्यात पोलीस विभागाला यश मिळाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.