 |
Chandrapur Corona Latest News |
Chandrapur Corona: जिल्ह्यात सोमवारी (दि.18) एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. गत 24 तासात जिल्ह्यात 3 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर सोमवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. (Chandrapur Corona Latest News)
Read News: Crime News | ५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 88 हजार 787 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 87 हजार 226 झाली आहे. सध्या 20 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 7 लाख 19 हजार 279 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 6 लाख 29 हजार 397 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1541 बाधितांचे मृत्यू झाले आहे.
Read Also: Suicide News | ट्रॅव्हल्स चालकाची गळफास घेत आत्महत्या
प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.