Wadsa News: वडसा रेल्वे स्थानकाजवळ रूळावर आढळला मृतदेह - BatmiExpress.com

वडसा रेल्वे स्थानकाजवळ रूळावर आढळला मृतदेह ,देसाईगंज वडसा रेल्वे स्टेशन लगतच्या रुळावर आढळला , Body found on track near Wadsa railway,BatmiExpress.com

वडसा रेल्वे स्थानकाजवळ रूळावर आढळला मृतदेह ,देसाईगंज वडसा रेल्वे स्टेशन लगतच्या रुळावर आढळला , Body found on track near Wadsa railway,BatmiExpress.com
मृतदेह डोक्याचा अर्धा भाग झाला चेंदामेंदा

Wadsa News / 
देसाईगंज: येथील वडसा रेल्वे स्थानकाच्या लाखांदूर टी- एका पॉईंटजवळील बोगदाजवळून रेल्वेरूळ ओलांडण्यासाठी लोकांनी तयार केलेल्या पायवाटेजवळ रेल्वे रूळाला लागून शहरातील एका वृद्ध इसमाचा मृतदेह आढळला. त्याच्या डोक्याला गंभीर मार लागलेला आहे. यावरून एखाद्या जड वस्तूने डोक्यावर मारून हत्या केल्यानंतर मृतदेह तिथे आणून टाकला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे . रघुनाथ नत्थुजी धनोजे ( ६० वर्ष , रा. तुकूम, देसाईगंज ) असे मृतकाचे नाव आहे. रेल्वेमार्ग ओलांडण्यासाठी केलेल्या त्या पायवाटेने सकाळच्या सुमारास अनेक लोक फिरायला जातात. ( Body found on track near Wadsa railway station )

दरम्यान , जुन्या रेल्वे फाटकाच्या अलीकडील पाण्याच्या टाकीजवळ एका इसमाचा मृतदेह नागरिकांना दिसला. डोक्याचा अर्धा भाग चेंदामेंदा झालेला होता. स्टेशन मास्तरांनी देसाईगंज पोलीस स्टेशनला कळविताच पोलीस घटनास्थळावर दाखल झाले; पण रेल्वे स्थानक परिसरात तो मृतदेह मिळाल्याने ही जबाबदारी रेल्वे पोलीस विभागाची आहे, तेच उत्तरीय तपासणी करणार असल्याचे सांगण्यात आले. हा खून की अपघात याविषयी संभ्रमावस्था असून पोस्टमार्टम झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण कळू शकेल. सध्या तरी देसाईगंज शहरासह परिसरात अनेक चर्चाना पेव फुटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.