आईवडिलांच्या डोळ्यादेखत आठ महिन्याचा चिमुकला ठार
राजुरा:- राजुरा तालुक्यातील रामपूर-माथरा रोडवरील वळणावर सायंकाळी ६ वाजता झालेल्या मोटरसाईकल अपघातात चिण्णा महेंद्र चित्तलवार (वय ८ महिने) व संदीप सुधाकर काटवले (वय २८) यांचा मृत्यू झाला तर महेंद्र चित्तलवार व अल्का चित्तलवार जखमी झाल्या असून जखमींना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. ( Two killed and two injured in two-wheeler accident )
सप्टेंबर १७, २०२१
0
सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान महेंद्र चित्तलवार हा पत्नी अल्कासह आपल्या आठ वर्षाच्या मुलाला राजुऱ्याकडे दवाखान्यात येत असताना विरुद्ध दिशेने राजुरा कडून साखरीकडे येणाऱ्या संदीप सुधाकर काटवले यांची रामपूर-माथरा वळणावर दोन्ही मोटार सायकलची जोरदार धडक झाली यात महेंद्र चित्तरवार यांचा आठ महिन्याचा मुलगा चिण्णा हा जागीच ठार झाला तर संदीप काटवले हा दवाखान्यात उपचाराकरिता अनंत असताना मृत पावला.
महेंद्र चित्तरवार व अल्का चित्तरवार हे दोघे पती पत्नी जखमी असून यांना उपचाराकरिता जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.