Nagbhid Crime News: धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून प्रेयसीसोबत शारीरिक संबंध, प्रियकराचा लग्नास नकार - BatmiExpress.com

Nagbhid Crime News: धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून प्रेयसीसोबत शारीरिक संबंध, प्रियकराचा लग्नास नकार,Nagbhid Crime News,Nagbhid Crime

Nagbhid Crime News: धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून प्रेयसीसोबत शारीरिक संबंध, प्रियकराचा लग्नास नकार,Nagbhid Crime News,Nagbhid Crime
प्रियकराचा लग्नास नकार; प्रेयसीची तक्रार, प्रियकराला अटक.

नागभीड
:- नागभीड तालुक्यातील पोलिस स्टेशन तळोधी (बा.) अंतर्गत येत असलेल्या जीवनापूर येथील 22 वर्षीय युवकाने लग्नाचे आमिष दाखवून आपल्या प्रेयसी सोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, नंतर लग्नास नकार दिल्याने प्रेयसीने पोलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी विवेक जनबंधू रा. जीवनापूर या प्रियकरावर गुन्हा दाखल करून तळोधी पोलिसांनी त्याला सोमवारी अटक केली आहे. तालुक्यातील जीवनापूर येथील विवेक जनबंधू (22) याने आपल्या प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरीक संबंध प्रस्थापित केले. ( Physical relationship with the lover by showing the lure of marriage, refusal of the lover to marry )

मात्र, लग्नाचा विषय समोर येताच त्याने नकार दिला. अखेर प्रेयसीने तळोधी पोलिस स्टेशन येथे प्रियकरा विरोधात तक्रार दाखल केली. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी प्रियकरावर कलम 376 भांदवि अन्वये गुन्ह्यची नोंद केली. सोमवारी त्यास अटक केली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक डी.आर.शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आकाशकुमार साखरे करीत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.