⛔ ब्रह्मपुरीतील तरुण युवक आणि युवतींनो सिम फक्त ऑफिसिअल स्टोर वरूनच घ्या..ऑफर च्या नावाखाली तुमच्या नावावर दुसरी सिम ऍक्टिव्ह केली जात आहे. त्या सीम च गैर वापर केल जाऊ शकते.. मुलीनो तुमच नंबर लिक केल जाऊ शकते आणि गोळा सुद्धा केल जाऊ शकते. - बातमी एक्सप्रेस जाहीर सूचना

तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Mumbai Sakinaka Rape: साकीनाका परिसरातील बलात्कार पीडित महिलेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली - BatmiExpress.com

Mumbai Sakinaka Rape Case,साकीनाका परिसरातील बलात्कार पीडित महिलेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली,साकीनाका घटना !...मृत्यूशी तिची झुंज अपयशी ठरली,

 

Mumbai Sakinaka Rape Case,साकीनाका परिसरातील बलात्कार पीडित महिलेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली,साकीनाका घटना !...मृत्यूशी तिची झुंज अपयशी ठरली,
Mumbai Sakinaka Rape Case: मृत्यूशी तिची झुंज अपयशी ठरली

Mumbai Sakinaka Rape: मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या अत्याचार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. महिलेवर अत्याचार करण्यात आल्यानंतर गुप्तांगात रॉड घुसवल्याचा अमानवीय प्रकार समोर आला होता. साकीनाका परिसरात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ माजली होती.  जखमी अवस्थेत महिलेला उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र मृत्यूशी तिची झुंज अपयशी ठरली आहे. या घटनेवरुन संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त होत असून पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 45 वर्षीय आरोपी मोहन चौहानला अटक केली आहे. ( Mumbai Sakinaka Rape)

जाणून घ्या सविस्तर प्रकरण...

पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास कंट्रोल रुमला साकीनाका येथे खैराना रोडवर एक महिला रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडली असल्याचा फोन आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त आणि अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी महिलेला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केलं होतं.  महिलेवर उपचार सुरु होते, मात्र तिची स्थिती खूप गंभीर होती. उपचार सुरु असतानाच शनिवारी पीडितेचा मृत्यू झाला. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.