कोरची: दुकानदार महिलेचा विनयभंग करणाऱ्या युवकाला अखेर अटक - BatmiExpress.com

Gadchiroli News,Gadchiroli Live News,Marathi News, News,Latest News in Marathi,Crime News,कोरची: दुकानदार महिलेचा विनयभंग करणाऱ्या युवकाला अखेर अटक

Gadchiroli News,Gadchiroli Live News,Marathi News, News,Latest News in Marathi,Crime News,कोरची: दुकानदार महिलेचा विनयभंग करणाऱ्या युवकाला अखेर अटक
कोरची: दुकानदार महिलेचा विनयभंग करणाऱ्या युवकाला अखेर अटक

कोरची : एका दुकानदार विधवा महिलेच्या दुकानात शिरून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी जितेंद्र सुदाराम सहारे ( ३८ ) या युवकाला अटक केली . त्याला न्यायालयाने १४ दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. आरोपी हा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती या संघटनेचा जिल्हा संघटक म्हणून वावरत होता. याशिवाय तो एका न्यूज पोर्टलचा प्रतिनिधी असल्याचे सांगितले जाते .  ( Youth arrested for molesting shopkeeper. )

हेही वाचा: बापरे…..15 वर्षीय मुलीवर तब्बल 29 जणांनी 8 महिने केला बलात्कार, 26 गिरफ्तार

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार , आरोपी सहारे याने कोरचीतील एका ३६ वर्षीय महिलेच्या दुकानातभरदिवसा शिरून ‘ तू माझ्यासोबत का बोलत नाहीस , मला का भेटत नाहीस ‘ असे म्हणून हात पकडून तिला मारहाण करत तिचा विनयभंग केला . यामुळे पीडित महिलेने दि . २१ ला कोरची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली . त्यानुसार पोलिसांनी आरोपीला अटककेली . त्याच्यावर भादंवि कलम ३५४ , ३५४ ड , ४४८ , ५० ९ , ३२३ , ५०६ नुसार गुन्हा दाखल केला . बुधवारी कोरची पोलिसांनी आरोपीला कुरखेडा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ दिवसांचा एमसीआर दिला .

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.