![]() |
गडचिरोली जिल्हयात ओबीसींना 17 टक्के आरक्षण लागू |
Gadchiroli News: आदिवासी बहुल 8 जिल्हयातील ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण पुर्ववत करण्याचा निर्णय राज्यमंत्रीमंडळाने नुकताच घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली असून आज 23 सप्टेंबर रोजी शासनाने ओबीसीच्या आरक्षणाचे परिपत्रक निर्गमीत केेले आहे. त्यामुळे आता गडचिरोली जिल्हयात ओबीसीचे आरक्षण ( OBCReservation ) 6 टक्क्यावरून 17 टक्के लागू झाले आहे. आदिवासीबहुल 8 जिल्हयातील सुधारीत आरक्षणानुसार प्रत्येक जिल्हयाची सुधारीत बिंदूनामावली स्वतंत्रपणे निर्गमीत करण्यात येईल, असेही शासन परित्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
सुधारीत आरक्षणानुसार गडचिरोलीत जिल्हयात ओबीसी 17 टक्के, अनुसूचित जाती 12 टक्के, अनुसूचित जमाती 24 टक्के, विजा- अ 3 टक्केे, भज- ब 2.5 टक्के, भज – क 3.5 टक्के, भज- ड 2 टक्के, विमाप्र 2 टक्के, ईडब्लूएस 10 टक्के आणि खुला प्रवर्ग 24 टक्के असे आरक्षण लागू झाले आहे.
हेही वाचा: बापरे…..15 वर्षीय मुलीवर तब्बल 29 जणांनी 8 महिने केला बलात्कार, 26 गिरफ्तार