'
30 seconds remaining
Skip Ad >

भद्रावती: अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक - BatmiExpress.com

0

 

भद्रावती: अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक,अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीला अटक,crime news,Bhadravati news,rape news,Chandrapur crime news
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक

भद्रावती:- तालुक्यातील येथील एका १३ वर्षीय मुलीस आरोपी अनिल पिसे (२४) रा. कॉलरी हा मागील एक महिन्यापासून पाठलाग करून तिच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता.

दरम्यान आरोपी सदर मुलींला वारंवार मोबाईल क्रमांक मागत होता. पीडित मुलीने या बाबतची सदर माहिती आपल्या आईला सांगितली. पीडित मुलगी व तिची आई माजरी पोलीस स्टेशन गाठुन आरोपी अनिल पिसे याच्या विरुद्ध तक्रार दिली. गुन्हा दाखल होताच माजरी पोलीसांनी आरोपीला तत्काळ अटक केली.
दरम्यान आरोपीला वरोरा येथील न्यायालयात हजर केले असता, त्यास १५ दिवसाची न्यायालयीन कोठडी मध्ये रवाना करण्यात आले.


याप्रकरणी अल्पवयीन मुलगी व तिच्या आईने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून बालकांचे विनयभंग अत्याचारापासून संरक्षण कायद्याच्या कलमान्वये आरोपीविरोधात ३५४ (ड) भादवि, कलम ८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पांडे, ठाणेदार विनित घागे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विद्या जाधव (वरोरा) हे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×