'
30 seconds remaining
Skip Ad >

Bramhapuri News: वाघाच्या हल्लात गुराखी जखमी तर बैल ठार #TigerAttack - BatmiExpress.com

0

Bramhapuri News: वाघाच्या हल्लात गुराखी जखमी तर बैल ठार

Bramhapuri
तालुक्यातील दक्षिण परिक्षेत्रामध्ये वाघाने धुमाकुळ घातला असून पिसाळलेल्या वाघाने  गुराख्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले तर  काही वेळातच पुन्हा वाघाने एका बैलावर हल्ला करून जागीच ठार केल्याची खळबळजनक  घटना आवळगाव पासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या आवळगाव ते हळदा या रोडवर घडली आहे.

वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या गुराख्याच नाव गंगाराम जयराम तिवाडे (४०) असून रा.आवळगाव येथील रहिवासी आहेत. तर दुसरीकडे त्याच गावातील लटारु खेवले यांच्या मालकीच्या बैलावर त्याच ठिकाणी वाघाने हल्ला करून ठार केले आहे.

सदर वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेले गुराखी हे आपल्याच घरच्याच गायी,म्हशी व बैल चारत असताना मुख्य रोडलगत असलेल्या झुडपात दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने गुरांना सोडून अचानक थेट गुराख्यावर हल्ला करून ओढत नेत असताना गुराखी गंगाराम ने जोरजोरात आरडाओरड केल्याने रोडच्या दुसऱ्या बाजूला गुरे चारीत असलेल्याना आवाज जाताच त्यांनी लाठीकाठीसह गुराखी गंगारामच्या मदतीला शेतकरी, गुराखी व कोशाचे रान करणारे रानकरी मदतीसाठी धावुन आले.
त्यावेळी वाघाने नागरिकांची आरडाओरड बघून शेतकरी गंगारामला सोडून जंगलाच्या दिशेने पळ काढला. लगेच रक्तबंबाळ अवस्थेत घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी  गावात आणून सदर झालेल्या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली.

त्यावेळी वनविभागाचे आवळगावचे क्षेत्र सहाय्यक करंडे यांनी लगेच घटनास्थळी धाव घेत जखमी गुराखी गंगाराम ला  उपचारासाठी आरमोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असुन शेतकरी गंगारामच्या डोक्याला आणि पाठीवरती वाघाची नखे खोलवर रुतलेल्याने ते गंभीर जखमी झाले असल्याने उपचार सुरु करण्यात आला आहे . 
तर काही वेळातच त्याच पट्टेदार वाघाने जखमी केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा त्याच ठिकाणी लटारु खेवले यांच्या बैलावर वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याने ऐन हंगामाच्या वेळीचच शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असुन नागरिकांत नरभक्षक वाघाची मोठी दहशत निर्माण झाली असल्याने वन विभागाने वेळीच लक्ष घालून नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा. याशिवाय जखमी झालेल्या शेतकऱ्याला व लटारू खेवले यांच्या मालकीच्या ठार केल्याने उपासमारीची वेळ आली आहे म्हणून शासनाने तात्काळ मदत करण्यात यावी.


गांगलवाडी ते चिचगाव, डोरली, वांद्रा, आवळगाव, हळदा ,बोडदा, कोसंबी, भुज,एकारा परिसरात नेहमीच वाघाचे हल्ले होत असतात. कोणी इसम वाघाच्या हल्ल्यात ठार होतो तर कोणाला कायमचे अपंगत्व येते.
या परिसरातील वाघाला रक्ताची चटक लागलेली आहे अशा नरभक्षी वाघांना जेरबंद करून कायमचे हद्दपार करावे .अशी या परिसरातील जनतेची मागणी जोर धरू लागली आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×