पोलिसानेच केला युवतीचा विनयभंग, पोलिसांविरुद्ध तक्रार दाखल |
घुग्धूस / Chandrapur Crime News: चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत आहे म्हणून दारूबंदी हटविण्यात आली असा संदर्भ शासनाच्या अधिसुचनेत दिला गेला मात्र दारूबंदी हटल्यावर गुन्हेगारांना मोकळे रान झाले असून दिवसेंदिवस वाटमारी, गैंगवार व छेडखानीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. महिला सुरक्षेप्रती शासन तत्पर आहे असे वारंवार सांगितल्या जाते मात्र जेव्हा पोलीस प्रशासनातील कर्मचारी महिलांची छेड काढत असेल तर दाद मागायची कुठं असा प्रश्न आता नागरिकांना निर्माण होत आहे.
हेही वाचा: 16 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, 3 जणांवर गुन्हा दाखल
या प्रकरणात सदर पोलिस कर्मचारी सुनिल वरभे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून वृत्तलिहेतपर्यंत अटक करण्यात आली नव्हती.
जनता कॉलेज चौकात ३३ वर्षीय युवती आपल्या नातेवाईकांकडून जेवण केल्यावर घरी परत असतांना पोलीस शिपाई सुनील वरभे यांनी त्या युवतीचे वाहन थांबवित अश्लील भाषेत असभ्य वर्तन केले. त्यावेळी पोलीस शिपाई वरमे हे दारूच्या नशेत होते असा आरोप युक्तीने केला आहे. जनता कॉलेज परिसरात पोलीस व नागरिक असा वाद वाढल्याने, सदर युवतीने रामनगर पोलीस स्टेशन गाठत पोलिस कर्मचारी सुनील वरभे यांच्या विरोधात तक्रार दिली.