|
दुर्गापूर पोलिसांची अवैध कोंबडा बाजारावर धाड |
चंद्रपूर : गुप्त माहितीच्या आधारे दुर्गापूर पोलिसांनी वरवट शेत शिवारात अवैध कोंबडा बाजार धाड टाकून १ लाख ९० हजारांच्या मुद्देमालासह ५ आरोपींना अटक केल्याची कारवाई करण्यात आली आहे.
दुर्गापूर पोलिसांना वरवट शेत शिवारात अवैध कोंबडा बाजार सुरु असल्याची गुप्त माहिती मिळाली. सादर माहितीच्या आधारे धाड टाकली असत मुद्देमाल मिळून आला. मागील वर्षी अवैध कोंबडा बाजाराने धुमाकूळ घातला होता मात्र या वर्षी हद्द पार करीत काही बहाद्दराने चक्क शेत शिवारात अवैध कोंबडा बाजार सुरू केला. सदर कारवाई दरम्यान नंददीप विजय लोखंडे, महादेव गुलाब काठवटे, दामोदर खारकर ,रवी निंदेकर, नदीम छोटू शेख या आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी कडून नगद ११ हजार ७०० रुपये ५ कोंबडे, चार लोखंडी कात्या, ३ मोबाईल,३ मोटार सायकल, असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
सर्व पाचही आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कार्यवाही पोलीस निरीक्षक स्वप्निल धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.