Chandrapur Accident News: दुचाकीवरील नियंत्रण अचानक सुटले; अपघातात एक जागीच ठार - BatmiExpress.com

Be
0

Chandrapur,Accident,
पोंभुर्णा
:- पोंभुर्णा तालुक्यातील चेक खापरी जवळ दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने एका इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि. २७ सप्टेंबर ला रात्रौ. ७ वाजताच्या सुमारास घडली. मृतकाचे नाव अंकुश सुरेश मोरे रा. नवेगाव मोरे वय. ३२ वर्षे असे आहे.

सविस्तर वृत्त असे की, सदर व्यक्ती MH 34 N 5924 या दुचाकीने चंद्रपूरवरुन मोहाळा येथे जात असताना चेक खापरी जवळ दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने अंकुश रोडच्या कडेला कोसळला. या अपघातात त्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोंभुर्णा पोलिस घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

हेही वाचा:  गोसीखुर्द: 26 गावांचे ऐच्छिक पुनर्वसनास टप्प्याटप्प्याने मंजुरी देण्याचा निर्णय : ना. विजय वडेट्टीवार

पुढील तपास पोंभुर्णा पोलिस स्टेशनचे ठाणेदार जोशी यांच्या मार्गदर्शनात पो. उ. नि. दादाजी ओल्लालवार करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->