Chandrapur News: जादूटोणा केल्याच्या संशयावरून बेदम मारहाण |
चंद्रपूर / Chandrapur News: काळी जादू केली असा आरोप करीत एकाच कुटूंबातील वडिल दोन मुली व एका अल्पवयीन मुलाला जबर मारहाण करणाऱ्या आठ ते दहा आरोपींना पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला आहे. सदर घटना ३ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली धक्कादायक म्हणजे आरोपी हे पिडितांचे भाऊ व वडिल आहे. जिवती व नागभीडनंतर जिल्ह्यातील ही तिसरी घटना आहे. येथील भिवापूर वार्डात तोंडाच्या कॅन्सरने ग्रस्त होता. त्याच्यावर औषधोपचार करण्यात आले पण आराम पडला नाही. त्यामुळे शेवटी तो तांत्रिकबाबाच्या संपर्कात आला. यावेळी त्याला तुला हा आजार तुझ्या घरच्याच्याच करणीमुळे झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ऐकीव गोष्टीवर तुझ्यामुळेच मला हा आजार झाल्याचे ओरडून सांगितले. त्यामुळे दोन्ही भावात वाद झाला.
एक दिवस नारायण चहा घेण्यासाठी भिवापूर वार्डातील आरके चौकात गेले असता तिथे त्याचे वडील आशुला आले व त्यांनी काळा जादु करतो म्हणून नारायणच्या थोबाडीत मारले. त्यानंतर त्याचा भाऊ नरसिंग तेथे आपल्या पुतण्या इतर साथीदारासोबत आला व त्यानेही नारायणला लाता बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. आकाशला कळले, हे तिघेही तिथे आले तेव्हा आरोपींनी या तिघांनाही मारहाण केली. यात आकाशच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या तर दोन्ही मुलींना किरकोळ जखमा लागल्या.
या घटनेबाबत नारायण पद्मेवार यांनी सिटी पोलिस सामाजिक कार्यकर्ते मुषण फुसे व एएनआईएस चे पदाधिकारी अनिल दहागांवकर यांनी याबाबत जाब विचारला असता पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली परंतू कारवाई मात्र केली नाही. त्यानंतर दहागांवकर यांनी सिटी पो नि सुधाकर आंगोरे यांना फोनवरून स्थितीचे गांभिर्य लक्षात आणून दिल्यानंतर पोलिसांनी वेगाने पावले उचलत मध्यरात्री १० जणांना
६ आरोपींना दोन दिवसांचा पीसीआर:
भिवापूर वार्ड परिसरात एकाच कुटूंबातील चौघांना काळा जादु करण्याच्या संशयावरून दहा जणांनी जबर मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी दहा आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यायालयाने त्यातील ६ आरोपींना दोन दिवसाचा पीसी आर दिला आहे.