नागभिड तालुक्यात मिंडाळा येथे जादूटोणा केल्याच्या कारणावरून लाथाबुक्याने ,लोखंडी रॉडने आणि बांबूच्या काठीने मारहाण - बातमी एक्सप्रेस नागभिड

नागभिड तालुक्यात मिंडाळा येथे जादूटोणा,जादूटोणा लावल्याच्या कारणावरून लाथाबुक्याने आणि बांबूच्या काठीने मारहाण ,बातमी एक्सप्रेस नागभिड

नागभिड तालुक्यात मिंडाळा येथे जादूटोणा,जादूटोणा लावल्याच्या कारणावरून लाथाबुक्याने आणि बांबूच्या काठीने मारहाण ,बातमी एक्सप्रेस नागभिड
जादूटोणा लावल्याच्या कारणावरून लाथाबुक्याने आणि बांबूच्या काठीने मारहाण

नागभिड 
:- चंद्रपूर जिल्हयातील जिवती तालुक्यातील वणी खुर्द येथील जादूटोणा केल्याच्या संशयावरून मारहाण केल्याच्या घटनेची शाई वाळते न वाळते तिच पुन्हा नागभीड तालुक्यातील मिंडाळा येथे जादूटोणा केल्याच्या संशयावरून लाथाबुक्यांनी आणि काठी, लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना 31 ऑगस्ट 2021 रोजी उघडकीस आली आहे.

सदर घटनेची तोंडी फिर्याद श्रीमती इंदिराबाई कामठे (वय 70) यांनी आज 1 सप्टेंबर 2021 रोजी नागभिड पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. काल मंगळवारला 31 ऑगस्ट रोजी दुपारी 3 ते 4 वाजताच्या दरम्यान फिर्यादीचा मुलगा अशोक कामठे रा.मिंडाळा ( टोली) हा जादूटोणा करतो या कारणावरून आरोपी प्रमोद सडमाके,सीताराम सडमाके,मयुरी सडमाके,पिल्ला आत्राम रा. सर्व रा.मिंडाळा ( टोली) व मयुरी सडमाके हिची आई रा.कानपा यांनी फिर्यादीची मुलगी यशोदा कामठे हिला हातांबुक्यांनी मारहाण केली व पिल्ला आत्राम व प्रमोद सडमाके यांनी फिर्यादीचा मुलगा अशोक कामठे याला नागभीड येथून त्याचे मोटर सायकल ने मौजा रा.मिंडाळा ( टोली) येथे जबरजस्तीने घेऊन येऊन निकेश सडमाके याचे घरासमोरील असलेल्या पाण्याच्या टाकीचे लोखंडी अँगलला दोरीने बांधून त्याला बॅटने व बांबूच्या काठीने मारून जखमी केले. तसेच फिर्यादीला काठीने मारून जखमी केले. परंतु फिर्यादी जवळ आरोपी विरुद्ध तक्रार देण्याकरिता कोणतेही साधन नसल्याने पोलीस स्टेशन ला येऊ तक्रार देण्यासाठी शकली नाही. मात्र आज बुधवारी फिर्यादीने आपल्या मुलीसह नागभीड पोलिस ठाण्यात येवून तक्रार दिली. सदर घटनेची गंभीर दखल घेत आरोपी विरुद्ध 330/2021 कलम 143, 147, 148, 149, 452, 324, 342, 363, 368, 323 भांदवी सह कलम 3 (1)(2) महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष,अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 2013 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदर घटनेचा तपास ठाणेदार प्रमोद मडामे करीत आहेत. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता घटनास्थळी पोलीस ताफा पोचला असून प्राथमिक तपास करून आरोपीचा शोध घेऊन आरोपीना ताब्यात घेण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस अधिक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे यांनी भेट देऊन या घटनेबाबत मार्गदर्शन केले आहे तसेच गावात शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. जिवती तालुक्यातील वणी खुर्द येथील घटना ताजी असतानाच पुन्हा नागभिड तालुक्यात मिंडाळा येथे जादूटोणा केल्याच्या संशयावरून मारहाण केल्याची घटना उघडकीस आल्याने जादूटोण्यांच्या घटना रोखण्याचे आव्हाण निर्माण झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.