
Gondia: ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पांगोली नदी पात्रात बुडून वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना ३० ऑगस्ट रोजी सायंकाळ सुमारासची आहे. देवचंद मुनशी अंबुले (७२) रा. आंबाटोली फुलचूर असे मृतकाचे नाव आहे. ( An old man drowned in the river Pangoli )
देवचंद अंबुले हे ३० ऑगस्ट रोजी पांगोली नदीच्या काठावर म्हशी चारण्यासाठी गेले होते. त्यातच त्यांचा नदी पात्रात पडून मृत्यू झाला. घरी परत न आल्याने त्याचा शोध घेतला मात्र त्यांचा पत्ता लागला नाही. त्यातच आज (ता.३१) सकाळी जिल्हा शोध बचाव पथकाच्या माध्यमातून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तक्रारीवरून पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे.