![]() |
अर्जुनी - मोरगाव: गळफास घेऊन युवकाची आत्महत्या |
अर्जुनी - मोरगाव: तालुक्यातील तिडका येथील एका २४ वर्षीय युवकाने शेतशिवारात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना २१ ऑगस्ट दुपारी १ ते रात्री ८ वाजता दरम्यानची आहे. देवेंद्र सुखराम पुसाम असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. सविस्तर असे की, तालुक्यातील तिडका येथील देवेंद्र सुखराम पुसाम हा काल दुपारचे जेवण करून नेहमीप्रमाणे गावात निघून गेला.
हेही वाचा: गोसेखुर्द नहरात महिलेचा प्रेत आढळला
मात्र, रात्री ८. वाजेपर्यंत तो घरी परत आलाच नाही. दरम्यान त्याचा शोध घेतला असता शेतशिवारात दारूच्या नशेत एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची बाब समोर जाली. या घटनेची नोंद अर्जुनी मोरगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.