आला रे वाघ आला.... रस्त्यावर वाघ दिसताच दुचाकीस्वार रस्त्यावर पडला; वडसा तालुक्यातील घटना | बातमी एक्सप्रेस वडसा

रस्त्यावर वाघ दिसताच दुचाकीस्वार रस्त्यावर पडला;रस्त्यावर वाघ दिसताच दुचाकीस्वार रस्त्यावर पडला; वडसा ,Desaiganj,wadsa,तालुक्यातील घटना,

आला रे वाघ आला.... रस्त्यावर वाघ दिसताच दुचाकीस्वार रस्त्यावर पडला; वडसा तालुक्यातील घटना
रस्त्यावर वाघ दिसताच दुचाकीस्वार रस्त्यावर पडला;

देसाईगंज ते आरमोरी मार्गावर कोंढाळा जंगलादरम्यान रस्ता ओलांडणारा वाघ दिसताच दुचाकीस्वार खाली कोसळून जखमी झाला . त्याला उपचारासाठी नागपूरला हलविल्याचे सांगितले जाते . जंगलामधील कक्ष क्रमांक ५८ च्या हद्दीत हा अपघात घडला . प्रमोद दिनाजी कुकुडकर ( ३६ ) रा.बेडगाव ( ता.गडचिरोली ) हा युवक आरमोरीवरून वडसाकडे सकाळी ८ वाजताच्या दरम्यान रस्ता ओलांडत होता . वाघाला समोर पाहताच कुकुडकर घाबरला आणि त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले . त्यामुळे तो दुचाकीसह रस्त्यावर पडला .

देसाईगंजला हा युवक भाजीपाल्याचा व्यवसाय करीत असल्याने दररोज सकाळी देसाईगंजला जात असतो . सदर युवकाच्या पाठीला जखम झाली आहे . या घटनेची माहिती वन विभागाला कळविल्यानंतर कोंढाळा वनपरिक्षेत्र अधिकारी विजय धांडे , वन्यजीव अधिकारी आर.बी. इनवते , क्षेत्र सहायक के.वाय . कहाडे , वनरक्षक सलीम सय्यद यांनी जखमी इसमाला देसाईगंजला नेले . त्यानंतर गडचिरोली आणि नंतर नागपूरला उपचारासाठी नेले असल्याची माहिती आहे .

नोट: सदर बातमी हि अपडेट होत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.