![]() |
आईच्या बँक खात्यातून PUBG साठी 10 लाख रुपये खर्च करून झाला फरार - Img File - PUBG |
Mumbai News: मुंबईतील जोगेश्वरी परिसरात आई-वडिलांनी त्याला फटकारल्यानंतर 16 वर्षीय किशोर घरातून पळून गेला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पळून गेलेल्या किशोर वयीन मुलीचा शोध घेऊन त्याला अंधेरी पूर्वेतील महाकाली लेणी परिसरातून त्याच्या पालकांकडे पाठवण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोरच्या वडिलांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला. तपासादरम्यान, किशोरच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की, त्याला गेल्या महिन्यापासून PUBG खेळण्याचे इतके व्यसन लागले आहे की त्याने मोबाईल फोनवर खेळताना आपल्या आईच्या बँक खात्यातून दहा लाख रुपये खर्च केले. पब्जीच्या आय डी आणि यू जी प्राप्त करण्याच्या नादात 10 लाख रुपये खर्च केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलांच्या ऑनलाईन व्यवहाराबद्दल पालकांना कळले तेव्हा त्यांनी त्याला खडसावले. त्यानंतर तो पत्र घरीच ठेवून निघून गेला.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.