बुलढाणा: शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयालगतच असलेल्या बीएसएनएलच्या साडेतीनशे फूट उंच टॉवरवर एक व्यक्ती चढल्याचा धक्कादायक प्रकार पहायला मिळाला आहे. टॉवरवर चढलेल्या व्यक्तीला पाहण्यासाठी शहरवासीयांनी एकच गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्यक्ती एवढ्या उंच टॉवरवर का चढला यामागचे कारण अद्यापपर्यंत समजले नाही.
दरम्यान पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून, टॉवरवरील व्यक्तीला खाली उतरवण्यासाठी अद्यापही प्रयत्न सुरुच आहेत.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.