नागपूरची ‘गंगाजमुना’ आखिकार पूर्णपणे सील; २०० पोलिसांचा ताफा तैनात
Nagpur News: शहरातील बदनाम वस्ती गंगाजमुनात काही दिवसांपासून अवैध धंदे, गांजा-ड्रग्सच्या विक्रीसह गुंडांचा वावर वाढला होता. त्यामुळे तेथे मोठे कांड होण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी बुधवारपासून गंगाजमुना परिसर पूर्णपणे बंद केला आहे. गंगाजमुनात २०० पोलिसांचा ताफा तैनात केला आहे. येथील सर्वच रस्त्यावर बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी ‘सकाळ’ला दिली. गंगाजमुनात कोरोना नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. या भागात गुन्हेगारांचा वावर असून, काही दलाल अल्पवयीन मुलींकडून बळजबरीने देहव्यापार करवून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याशिवाय परिसरातील नगरसेवक व प्रतिष्ठित नागरिकांनीही गंगाजमनामुळे होणाऱ्या त्रासाबाबत पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली.
हेही वाचा: लग्नाला झाले नाही धड दोन महिने अन् नवविवाहिता झाली विधवा याची दखल घेत पोलिस आयुक्तांनी बुधवारी रात्री पोलिसांनी कायद्यानुसार गंगाजमुना सील करून या भागात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. याबाबतची अधिसूचनाही काढण्यात आली. यासह लकडगंज पोलिसांसह पाच अधिकारी व १०० पोलिस कर्मचाऱ्यांच्या प्रचंड ताफा या भागात तैनात करण्यात आला. आहे. बुधवारी रात्री पोलिसांनी गंगाजमुनाची झाडाझडती सुरू केली. बाहेरून आलेल्या व्यक्तींची धरपकड सुरू असून, त्यांच्यावर पोलिस ठाण्यात कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.दारू दुकानांचे परवाने रद्दगंगाजमुना परिसरात देशीदारू, बिअर शॉपी, वाईनं शॉपसह एक बिअर बार आहे. या सर्वांचे परवाने रद्द करण्याचे पत्र आयुक्तांनी उत्पादन शुल्क विभागाला पाठविले आहेत.
आता उत्पादन शुल्क विभाग आयुक्तांच्या पत्रावर काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे. तसेच येथील पानठेल्यावरून ड्रग्स-गांजाविक्री होत होती, त्याचीही माहिती पोलिस आयुक्तांपर्यंत पोहोचली होती. अनधिकृत बांधकामे तोडणारगंगाजमुनातील घरांमध्ये देहव्यापारासाठी अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. हे बांधकाम तोडण्याची विनंती सीपी अमितेश कुमार यांनी महापौर तिवारी यांना केली आहे. नियमानुसार योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन महापौरांनी आयुक्तांना दिले. सध्यस्थितीत गंगाजमनात सुमारे ६०० वारांगना असल्याची माहिती आहे. लवकरच मनपाचा बुलडोजरही येथे चालणार आहे.