![]() |
दूध वाहनाची ट्रॅक्टरला जबरदस्त धडक |
अड्याळ कारथा पवनी रस्त्यावरील अड्याळ येथे एका दूध संकलन करणाऱ्या वाहनाने थान पोते भरुन येत असलेल्या ट्रॅक्टरला जबर धडक दिली. या धडकेत दूध वाहनावरील दोघे जण जखमी झाल्याची घटना आज दि. ११ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री ८ वाजता दरम्यान घडली.
रावणवाडी येथील टाटा एस दूध वाहन हे दूध संकलन करण्याकरीता कोंड्याकडे जात असतांना अडाळ येथे थान पोते भरुन येणाऱ्या ट्रॅक्टरला जबर धडक दिली. या धडकेत दूध संकलन करणाऱ्या बाहनाचा समोरील भागाचा चेंदामेंदा झाला. बाहना तील चालक व वाहक दोघे जखमी झाले. या अपघातात चालकाचे पाय तुटल्याचे सांगितले जाते. जखमींना ग्रामीण रुग्णालय अडधाळ येथे नेण्यात आले.
मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने जखमींना भंडाऱ्याला हलविण्यात आले. वृत्त लिहीपर्यंत जखमींची नावे कळू शकली नाही. घटने चा तपास अड्याळ पोलीस करीत आहेत.