'
30 seconds remaining
Skip Ad >

भंडारदरा धरणात बुडून पर्यटकाचा मृत्यू; पर्यटकाचा पोलिसांकडून शोध सुरुच | बातमी एक्सप्रेस

0

भंडारदरा धरणात बुडून पर्यटकाचा मृत्यू

अहमदनगर
शहरात विकेंडला भंडारदरा धरण या परिसरात येणाऱ्या पर्यटनावर बंदी घालण्यात आली होती, मात्र पर्यटकांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे चित्र दिसून आले आहे. अतितीव्र पावसामुळे भंडारदरा धरणातील पाण्यात एका पर्यटकाचा बळी गेला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

शरातील भंडारदरा धरणाच्या सांडव्याच्या वक्राकार लोखंडी दरवाजा जवळ (स्पीलवे) अज्ञात पर्यटकांचे बुट, पायमोजे व इतर साहित्य बेवारस मिळून आले.

हेही वाचा:  Chandrapur News: चंद्रपुरात शेतकरी आत्महत्यांचा वीस वर्षातील उच्चांक

धरणातील पाण्यात एक पर्यटक बुडाल्याने नागरिक व पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत होता.  मात्र पर्यटकांनी तेथे गर्दी केल्यानंतर शोध कार्यात अडथळे येत होते. शोध कार्यात बाधा येऊ नये म्हणून पोलिसांकडून तेथे येण्यास पोलिसांनी पर्यटकांना बंदी घातली. 

मात्र याचा राग येऊन काही पर्यटकांनी पोलिसांशीच हुज्जत घालून मारहाण केली. यात दोन पोलीस जखमी झाले. याप्रकरणी सहा पर्यटकांविरोधात राजूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर धरणात बुडालेल्या पर्यटकाचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×