- प्रतिनिधी: रजत डेकाटे
Nagpur News - भिवापूर: शेताच्या धूऱ्यावर काट्या टाकल्यावरुण दोन आरोपींनी एका शेतकऱ्याला बेदम मारहाण केली. त्यात शेतकऱ्याच्या पायाला गंभीर दुखपत झाली आहे. ही घटना तालुक्यातील चोरविहिरा येथे शुक्रवारी (दि. ९) सायंकाळी ४:३० वाजता च्या सुमारास घडली. दरम्यान पोलीसांनी आरोपींनी विरुद्ध गुन्हा नोंदविला असून कारवाई सुरू केली आहे.
शेषराव रंदई व लिलाधर चौधरी हे दोन्ही रा. चोरविहिरा ता. भिवापूर अशी आरोपींची नावे असून मारुती चिंधू खाटे (५५ रा चोरविहिरा ता. भिवापूर) असे जखमी शेतकऱ्यांचे नाव आहे.
शुक्रवारी मारुती खाटे हे आपल्या शेतात काम करीत होते. वन्यप्राण्यांकडून पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी शेताच्या धूऱ्यावर काट्या टाकल्या दरम्यान सायंकाळी ४:३० वाजता च्या सुमारास दोन्ही आरोपींनी तेथे येऊन रस्त्याचा वाद उकरून काढत धूऱ्यावर टाकल्यावरुण वाद घातला अशातच आरोपींनी खाटे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली रक्तबंबाळ अवस्थेत जखमी शेतकऱ्यांस भिवापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र पायाला फ्रॅक्चर असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना नागपूरला हलविले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३२४, ३२५, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. ठाणेदार महेश भोरटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्य़ाचा पुढील तपास उपनिरीक्षक प्रकाश चंगोले करीत आहेत.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.