1. मेष : व्यावसायिक स्थितीत काही अनुकूल बदल होऊ लागतील. मात्र कोणतेही मोठे निर्णय तूर्तास घेऊ नयेत.
2. वृषभ : संयम टिकवून ठेवावा लागेल. चांगला व्यावसायिक लाभ होईल. स्थावरच्या व्यवहारातून लाभ होईल.
3. मिथुन : मुद्यांपासून दूर जाऊ नका. गरज भासल्यास थोडी माघार घेण्यास हरकत नाही. कामाचा ताण जाणवेल.
4. कर्क : व्यावसायिक अनुकूलता मिळेल. इतरांचा विचार आधी करावा लागेल. हातातील कामात यश येईल.
5. सिंह : अनुकूलतेसाठी फार काळ वाट पहावी लागणार नाही. औद्योगिक प्रतिष्ठा जपाल. अतिविचार करण्यात वेळ वाया जाईल.
6. कन्या : भागीदारीत चांगला लाभ होईल. अपेक्षित लाभणे खुश व्हाल. पत्नीची कामात उत्तम साथ मिळेल.
7. तूळ : कमतरता भरून निघण्यास सुरुवात होईल. नसते साहस करताना सारासार विचार करावा.
8. वृश्चिक : आर्थिक जुळवाजुळव करावी लागेल. आव्हाने पेलायला बळ मिळेल. कामातून इच्छित ध्येय साध्य करता येईल.
9. धनु : वरिष्ठांशी तेढ वाढवू नका. प्रामाणिक मार्ग स्वीकारा. अधिकारी वर्गाचे मार्गदर्शन घ्यावे.
10. मकर : कामाची थोडीफार धांदल राहील. भावंडांशी मतभेद वाढवू नका. धार्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल.
11. कुंभ : योग्य नियोजनावर भर द्यावा लागेल. नोकरदारांचा उत्साह वाढीस लागेल. कौटुंबिक बाबी शांततेने हाताळाव्यात.
12. मीन : खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावी लागतील. डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. लहान-सहान गोष्टी मनावर घेऊ नका.