धक्कादायक घटना.. आई,वडीलांसह मुलाची तापीनदीत आत्महत्या | #Suicide बातमी एक्सप्रेस

आई,वडीलांसह मुलाची तापीनदीत आत्महत्या,marathi updates, maharashtra, maharashtra news, marathi updtes, marathi news, Dhule,आत्महत्या,suicide,suicide

आई,वडीलांसह मुलाची तापीनदीत आत्महत्या,marathi updates, maharashtra, maharashtra news, marathi updtes, marathi news, Dhule,आत्महत्या,suicide,suicide
आई,वडीलांसह मुलाची तापीनदीत आत्महत्या 

Dhule: आई,वडील व मुलाने एकत्र तापी नदीत उडी घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.मात्र आत्महत्याचे कारण समजू शकलेले नाही. शिरपूर तालुक्यातील गिधाडे येथील तापी नदीपात्रात तीन जणांनी आत्महत्या केल्याची घटना दि 21 रोजी सायंकाळी उघडकीस आली होती.

आत्महत्या करत असल्याचे प्रथमदर्शनी एकाने बघितले होते मात्र आत्महत्या करणारे कोण याबाबत काही एक माहिती प्राप्त झालेली नव्हती.गिधाडे तापी नदीपुलावर एक बॉक्सर मोटरसायकल,चपल्ला व विषारी औषधाची बाटली मिळाली होती.घटनास्थळी मोठ्याप्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र हातनुर धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आल्याने नदीपात्रात संपूर्ण गढुळ पाणीचा लोंढा वाहत होता यामुळे येथे समजे कठीण झाले होते.

हेही वाचा:  गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले, गोसीखुर्दमधून 3929 क्युसेक पाण्याचा विसर्ग, क्युसेक मध्ये वाढ होण्याची शक्यता

घटनास्थळी शिंदखेडा पोलीस स्टेशन दाखल होऊन याबाबत चौकशी सुरु केली.रात्री उशीराने सदर आत्महत्या करणारे कोण व कुठले याबाबत माहिती प्राप्त झाली. शहादा तालुक्यातील लोंढरे या गावातील नथा बुधा वाघ वय 56,त्यांची पत्नी सखुबाई नथा वाघ व मुलगा गोपाल नथा वाघ वय 30 यांनी आत्महत्या केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

आत्महत्या मागील कारण समजू शकलेले नाही. शहादा तालुक्यात वास्तव्यास असतांना शिरपूर तालुक्यात येऊन तापी नदी पात्रात आत्महत्याचे कारण काय याबाबत माहिती मिळालेली नाही.. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.