![]() |
11th Admission: अकरावी प्रवेशाला सीईटी आवश्यक? |
11th Admission 2021: राज्यातील सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशात प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. CET परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाल्यावर सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांना उर्वरित रिक्त जागांवर दहावीतील मार्कशीट नुसार अकरावी प्रवेश मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी आज मोठी घोषणा केली आहे. (11th Admission 2021 )
अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थाना सीईटी देणे आवश्यक आहे, कारण सीईटी परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाल्यावरच न दिलेल्या विद्यार्थाना अकरावीत दहावीच्या मार्कशीट नुसार प्रवेश मिळणार आहे.
सीईटी परीक्षा साठी ऑनलाईन अर्ज असे करा:
- महाराष्ट्र राज्य शिक्षण व संशोधन परिषदेच्या https://www.maa.ac.in या वेबसाईट वर विद्यार्थ्यांना हे अर्ज Online पद्धतीने भरता येतील.
- CET परीक्षा Offline पद्धतीने होणार आहे.
- विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र कुठे असेल याविषयी लवकरच सांगण्यात येणार.
- पोर्टल वर क्लिक केल्यावर विद्यार्थ्यांना आपला बोर्डाचा बैठक क्रमांक भरावा लागेल.
- नंतर परीक्षा द्यायची आहे की नाही असे दोन पर्याय दिले जातील.
- त्यातील योग्य पर्याय निवडून फॉर्म भरावयाचा आहे.
हेही वाचा: दहावीचा निकाल जाहीर! 99.95 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा, 99.84%
सीईटी विद्यार्थाना उत्तम मार्क्स मिळाले कि विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचा पुन्हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. कारण (11th Admission 2021 ) एसएससीबरोबरच (SSC ) सीबीएसई (CBSC ) आणि आयासीएसई (ICSE ) बोर्डाच्या विद्यार्थ्यांना देखील सीईटी परीक्षा दिल्यावरच अकरावी प्रवेशासाठी पात्र ठरविले जाणार आहे. CET पास झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाल्यावरच न दिलेल्या विद्यार्थाना अकरावीत दहावीच्या मार्कशीट नुसार प्रवेश मिळणार आहे.
सीईटी परीक्षेचे स्वरुप:
- CET परीक्षेसाठी 100 गुणांची एकच प्रश्नपत्रिका / पेपर असेल.
- परीक्षेचा कालावधी 2 तास राहील.
- इंग्रजी, गणित, विज्ञान व समाजिक शास्त्र या विषयावर प्रत्येकी 25 प्रश्न विचारले जातील.
- परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येईल.
- प्रश्न पत्रिकेचे स्वरुप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचे (Multiple Choice Objective Type Questions) असेल.
- परीक्षा O.M.R. आधारीत असेल.
Maharashtra SSC Results 2021: महाराष्ट्र बोर्डाचा निकाल 16 जुलै 1 वाजता जाहीर करण्यात आलं होत. यावर्षी महाराष्ट्र SSC बोर्डाने 99.95 उत्तीर्ण टक्केवारी नोंदविली आहे. कोकण विभागात 100 टक्के निकाल लागला आहे तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा 99.84 टक्के नोंदविण्यात आलं आहे. 15,75,752 विद्यार्थ्यांची संपदा शाळेकडून प्राप्त झाली त्यापैकी 15,74,994 उत्तीर्ण झाले आणि निकालाची 99.95 उत्तीर्ण टक्केवारी लागली. राज्यात ९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत. ७५८ विद्यार्थी नापास झाले आहेत. (11th Admission 2021)
दिनकर पाटील काय म्हणाले ?
राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी दिलेल्या माहितीप्रमाणे CET परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सोमवार 19 जुलैपासून राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज उपलब्ध होणार आहेत.
CET परीक्षेचे नियोजन सध्या अंतिम टप्प्यात असून दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना (11th Admission 2021) अकरावी प्रवेशासाठी 23 ऑगस्टपर्यंत स्वतंत्र सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे.
यामध्ये महाराष्ट्र राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी CET परीक्षा विनामूल्य असणार आहे. मात्र अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी CET परीक्षा शुल्क आकारण्यात येईल असे दिनकर पाटील यांनी सांगितले आहे.