 |
Chandrapur Crime News: चंद्रपूर जिल्हा दुहेरी हत्याकांडाने हादरला |
Chandrapur Crime News: चंद्रपूर जिल्ह्यात दिवसेंदिवस हत्याकांडाच्या प्रकार मध्ये वाढ होऊ लागली आहे. १७ जुलै रोजी बल्लारपूर शहरात दुहेरी हत्याकांड झाल्याचं धक्कादायक प्रकार समोर आल्याने, चंद्रपूर जिल्हा एकदा पुन्हा हादरला आहे. आजारी पत्नीच्या देखभालीत हयगय झाल्याने संतापलेल्या इसमाने सुन आणि पत्नीचा केला खून करून बल्लारपूर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले.
आजारी पत्नीला जेवण दिलं गेलं का याच्यावरून सासरा आणि सून यांच्यात कडाक्याचे मोठं भांडण झाले. भांडण विकोपाला गेल्यानंतर आरोपीने सर्वात आधी सुनेचा गळा दाबून हत्या केली.
आजारी पत्नीची काळजी कोण घेणार? अशाप्रकारची चिंता वाटल्याने आरोपीने पत्नीचाही खून केला. बल्लारपूर पोलिसांनी मुलाच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा झाला आहे. या धक्कादायक घटनेला ऐकताच पोलिसही सुन्न झाले.
बल्लापूर शहरातील शिवाजी वार्डात राहणाऱ्या काजल डे (वय ५८) यांची पत्नी 'आशा' हि कर्करोगाने पीडित होती. दीर्घकाळ रूग्णालयात राहिल्यानंतर ती नुकतीच घरी आली होती. डायलिसिसवर असलेल्या पत्नीची सुन प्रियंका व्यवस्थित देखभाल करत नव्हती यामुळे घरात वाद निर्माण झाले होते. आपले काम पूर्ण करून आरोपी घरी आलं होत. आरोपीची पत्नी आजारी असल्याने सुनेला विचारले कि जेवण दिले का? यावरून सून बोलली कि "वेळ मिळेल तेव्हा जेवण देईन" असे ऐकताच भांडणाला सुरुवात झाली. भांडण विकोपाला गेल्यानंतर आरोपी काजलने सुन प्रियंका हिचा गळा दाबून खून केला.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी गाठत दोघींनाही रुग्णालयात नेले. मात्र पत्नीचा आधीच मृत्यू झाला होता. तर रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काही तासांनी सुनेचाही मृत्यू झाला. बल्लारपूर पोलीस ठाण्यात काजल डे यांच्या मुलाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी काजल डे याला अटक करून बल्लारपूर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.