पूर्णा नदीला मोठा पूर; नदीकाठावरील नागरिकांना दक्षतेचा इशारा | बातमी एक्सप्रेस

पूर्णा नदीला मोठा पूर,पूर्णा नदीने धोक्याची पातळी ओलांडली,पूर्णा नदी दुथडी भरून वेगाने वाहत,Buldana,पूर,पाऊस,

पूर्णा नदीला मोठा पूर,पूर्णा नदीने धोक्याची पातळी ओलांडली,पूर्णा नदी दुथडी भरून वेगाने वाहत,Buldana,पूर,पाऊस,
पूर्णा नदीला मोठा पूर

अमरावती शहरात झालेल्या अति तीव्र पावसामुळे कोरडी असलेल्या पूर्णा नदीला मोठा पूर आला आहे. बुलढाणा जिल्ह्यातून पूर्णा नदी दुथडी भरून पुराचे पाणी वाहत आहे. पुराचा वेग जोराचा आहे. राज्यातील हवामानाचा अंदाज बघून काही जिल्ह्याना पावसाचा रेड अलर्ट सुद्धा देण्यात आलं आहे. तर काही भागात दमदार पाऊण पडल्याने राज्यावरील दुष्काळाचे मळभ बऱ्यापैकी दूर झाले आहे.

विदर्भातील अनके जिल्ह्यांमध्ये शनिवार व रविवारी पावसाची दमदार संततधार सुरू होती.  राज्यात सर्वदूर बरसलेल्या दमदार पावसाने राज्यावरील दुष्काळाचे मळभ बऱ्यापैकी दूर झाले आहे. यामुळे नद्यांच्या व तलावांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून नदीकाठावरील नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला.

अमरावती शहरातल्या काही भागांत झालेल्या दमदार पावसामुळे पूर्णा नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून, पूर्णा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

परिणामी, आतापर्यंत कोरडी पडलेलल्या पूर्णा नदीला मोठा पूर आला असून बुलढाणा जिल्ह्यातून वाहणारी पूर्णा नदी दुथडी भरून वेगाने वाहत आहे. 

दरम्यान, यामध्ये नांदुरा -जळगाव जामोद, शेगाव -वरवट बकाल मार्गावरील पूर्णा नदीवर असलेल्या पुलाला लागून पाणी वाहत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.