'
30 seconds remaining
Skip Ad >

Chandrapur News: चंद्रपुरात बालकांच्या न्युमोकॉकल लसीकरण मोहिमेचा शुभारंभ, महानगरपालिका बालकांना मोफत लस देणार | बातमी एक्सप्रेस

0


Chandrapur News: चंद्रपुरात बालकांच्या न्युमोकॉकल लसीकरण मोहिमेचा शुभारंभ,न्युमोकॉकल न्युमोनिया काय आहे?चंद्रपुर महानगरपालिका बालकांना मोफत लस देणार
Chandrapur News: चंद्रपुरात बालकांच्या न्युमोकॉकल लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

Chandrapur News
: बालकांना विविध आजारांपासून संरक्षण मिळण्यासाठी नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या लसी दिल्या जातात. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आता न्युमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन (पीसीव्ही) या नवीन लसीचा नियमित लसीकरण कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे. चंद्रपूर शहर महानगर पालिकेच्या माध्यमातून रामनगर येथील शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पीव्हीसी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. विशेष म्हणजे मनपाद्वारे बालकांना ही लस नि:शुल्क देण्यात येणार आहे.

कार्यक्रमाला महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मनपा आयुक्त राजेश मोहिते, उपायुक्त विशाल वाघ, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, नगरसेविका छबु वैरागडे, नगरसेवक देवानंद वाढई, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गलहोत, लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अविष्कार खंडारे, आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी भारत यांची उपस्थिती होती.

Chandrapur News: चंद्रपुरात बालकांच्या न्युमोकॉकल लसीकरण मोहिमेचा शुभारंभ,न्युमोकॉकल न्युमोनिया काय आहे?चंद्रपुर महानगरपालिका बालकांना मोफत लस देणार
चंद्रपुर महानगरपालिका बालकांना मोफत लस देणार

Chandrapur News: एक वर्षाच्या आतील बालकांना निमोनिया, मेनेटांयटीस, बॅक्टेरीमिया, सेपसीस, ओटायटीस आणि सायनुसायटीस आजारापासून ही लस संरक्षण देईल. न्युमोकोकल/निमोनिया हा फुफ्फुसांना होणारा संसर्ग आहे. ज्यामुळे बालकांना श्वास घ्यायला त्रास होतो. धाप लागते आणी ताप व खोकला येतो. संसर्ग गंभीर स्वरूपाचा असल्यास मृत्युसुध्दा होऊ शकतो, असे तज्ज्ञ सांगतात. निमोनियापासून लहान बाळांच्या संरक्षणासाठी न्युमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन (पीसीव्ही) देण्यासाठी पालकांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.
गंभीर न्युमोकॉकल आजार होण्याचा धोका दोन वर्षापर्यंतच्या बालकांमध्ये दिसून येतो. या लसीमुळे गंभीर न्युमोकॉकल आजारापासून बाळाचे संरक्षण तर होईलच सोबत समाजातील इतर घटकांमध्ये न्युमोकॉकल आजाराचा धोका कमी होण्यास मदत होईल. लस पूर्णपणे सुरक्षित असून लसीचा पहिला डोस दीड महिना पहिला पेंटासोबत, दुसरा डोस साडेतीन महिने तिस-या पेंटासोबत व तिसरा बुस्टर डोस 9 महिन्यात एम. आर. सोबत देण्यात येईल.

न्युमोकॉकल न्युमोनिया काय आहे?

न्युमोकॉकल आजार म्हणजे Streptococcus Pneumoniae या बॅक्टेरीयामुळे होणारा आजार आहे. StreptococcusPneumoniae हा बॅक्टेरीया 5 वर्षाच्या आतील मुलांमधील न्युमोनियाचे प्रमुख कारण आहे.
आजाराची लक्षणे :
ह्या आजाराची मुख्य लक्षणे खोकला, ताप येणे, धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी आहेत. ही लक्षणे आढळून आल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×