Chandrapur News: राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर | बातमी एक्सप्रेस

Be
0


Chandrapur News: राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Chandrapur News:
राज्याचे नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार दि.15 जुलै 2021: रोजी सकाळी 9:30 वाजता हिराई विश्रामगृह ऊर्जानगर येथून कोरपनाकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता कोरपना येथे आगमन व राखीव. दुपारी 12:30 कोरपना येथून जिवतीकडे प्रयाण. दुपारी 1 वाजता, विदर्भ महाविद्यालय जिवती येथे आगमन व राखीव. दुपारी 2 वाजता जिवती येथून पाटणकडे प्रयाण. दुपारी 2:30 वाजता पाटण येथे आगमन व खावटी योजनेअंतर्गत आदिवासी लाभार्थ्यांना किट वाटप व आदिवासी आश्रम शाळेसाठी पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन. दुपारी 4 वाजता पाटण येथून कोसंबीकडे प्रयाण, सायंकाळी 4:30 वाजता कोसंबी येथे आगमन व आदिवासी पाड्यास भेट. सायंकाळी 5 वाजता, कोसंबी येथून चंद्रपूरकडे प्रयाण. सायंकाळी 6 वाजता पंचवटी लॉन, तुकूम येथे आगमन व राखीव. सोयीनुसार हिराई विश्रामगृह ऊर्जानगर, चंद्रपूर येथे आगमन व राखीव.
शुक्रवार दिनांक 16 जुलै 2021 रोजी सकाळी 7:30 वाजता हिराई विश्रामगृह ऊर्जानगर, चंद्रपूर येथून नागपूर विमानतळाकडे प्रयाण करतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->