Chandrapur News: दारूबंदी उठविल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात दारूने घेतला पहिला बळी | बातमी एक्सप्रेस

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News IN Marathi,चंद्रपूर दारुबंदी,

Chandrapur News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur News IN Marathi,चंद्रपूर दारुबंदी,

Chandrapur News: चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून असेलेली दारूबंदी प्रशासनाकडून कोवीड-१९ च्या कालावधीत उठविण्यात आले आहे. व दारूबंदी उठल्याने एक जण दारू पित मनसोक्त आनंद लूटत असतानाच तोल जाऊन तो नालीत पडून बळी गेला असल्याची धक्कादायक घटना देखील घडली आहे.

जिल्ह्यातील सावली तालुक्यात या दारूने पहिला बळी गेल्याची धक्कादायक घटना घडली. मूल शहरात देशी दारूचे दुकान सुरू झाले. 

मागील सहा वर्षांपासून बंद असेलली दारू खूप प्रतिक्षेनंतर सुरु झाली. पहिल्याच दिवशी दारूचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी ३५ वर्षीय युवकाने मूल मधून ३ नीप देशी दारू आणली. दारू पित आनंद लुटत असतानाच अचानक त्याचा तोल जाऊन नालीत पडला. यातच ३५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. 

मयत तरुणाच्या आई-वडील या दोघांचाही पूर्वीच मृत्यू झाला होता. आता कुटुंबातील एकुलत्या एक मुलाचाही देखील दारूने बळी घेतला. 

दारूबंदी उठल्याने अनके महिल्यांच्या कुटुंबाचे विनाश होणार - याला जबाबदार प्रशासन का? जिल्ह्यात दारूबंदी का नाही? 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.