गडचिरोली: अति हिमवर्षा मूळे गोविंदपूर पुलानजिक रपटा गेला वाहून.... | बातमी एक्सप्रेस

Gadchiroli News,गडचिरोली,Gadchiroli Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Latest Marathi News,Marathi News Updates,Marathi News,चामोर्शी

Gadchiroli News,गडचिरोली,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Latest Marathi News,Marathi News Updates,Marathi News,

गडचिरोली: जिल्ह्यात बुधवारला मध्य रात्री पासून पाऊसाचे आगमन झाले. यामुळे सर्वत्र ठिकाणी पाणीच पाणी झालेय. गोविंदपूर नाल्यावर नवीन पुलियाचे व सिमेंट रोड चे बांध काम सुरु आहे. त्यामुळे वाहतुकींना जाण्यासाठी पुलिया लगेतच कच्चा रस्ता बनविण्यात आला. पण पाऊसाचे अति वर्षा मूळे सकाळ सुमारास पावसाच्या प्रवाहाने पूर्ण पणे कच्चा रस्ता वाहून गेलाय. त्यामुळे गडचिरोली ते चामोर्शी महामार्गाचा संपर्क सुद्धा तुटला.

हे ठिकाण गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या 18 किमी अंतरावर आहे. गोविंदपूर गावानजिक असलेल्या नाल्यावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरनामार्फत नवीन पुलियाचे आणि सिमेंट रोडचे बांध काम सुरु आहे. अनेक ठिकाणी पुलियाचे बांध काम सुरु असल्याने वाहतुकीसाठी कच्चा रस्ता बांधला गेलाय.पण अति हिमवर्षा झाल्यामुळे गोंविंदपूर परिसरातील नाल्यावरील पुलियालगत असलेला कच्चा रस्ता पाण्याने वाहून नेलाय. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली. आणि अनेक गावाचा जिल्ह्याशी संपर्क तुटला

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.