![]() |
Astrology: आजचे राशिभविष्य;20 जुलै 2021 |
1. मेष : पत्नीला कामात सहकार्य करावे. स्वभावात काहीसा तिरकसपणा येऊ शकतो. निष्कारण येणारी उदासी टाळावी.
2. वृषभ : कामाचा फार गवगवा करू नका. संसर्गजन्य विकारांपासून सावधानता बाळगावी. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.
3. मिथुन : हातातील कामात यश येईल. ठरवलेली कामे समाधानकारक फळ देतील. घरातील जबाबदारी उत्तमरीत्या पेलाल.
4. कर्क : कामाचा फार ताण घेऊ नका. विवेकाने केलेली कामे फळाला येतील. योग्य नियोजनावर भर द्या.
5. सिंह : प्रिय व्यक्तीच्या शब्दात अडकाल. व्यवहारी दृष्टीकोन बाळगावा लागेल. हित शत्रू नरम होतील.
6. कन्या : आवडत्या कामात गुंग व्हाल. कामे सुलभतेने पार पडतील. जोडीदाराशी ताळमेळ जुळवावा लागेल.
7. तूळ : देणी-घेणी मिटतील. नामस्मरण केल्याने चित्त शांत होईल. कफाचे विकार संभवतात.
8. वृश्चिक : कामातील अडचणी कमी होतील. स्थावर संबंधी व्यवहार पुढे सरकतील. जोखीम घेऊन कामे स्वीकारावी लागतील.
9. धनु : नवीन बदल स्वीकारावे लागतील. मन काहीसे विचलित राहील.
10. मकर : नवीन गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. योग्य संधीचा लाभ घ्यावा. व्यापार्यांना काही चांगले लाभ होतील.
11. कुंभ : चुकीच्या गोष्टींची चर्चा टाळावी. बोलताना संयम राखावा. आळस झटकून कामाला लागावे.
12. मीन : स्वमतावर ठाम राहावे. जबाबदारी झटकून चालणार नाही. स्वत:वर ठाम विश्वास ठेवावा.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.