गडचिरोली-चामोर्शी मार्ग दुसऱ्याही दिवशी बंदच
गडचिरोली जिल्ह्यात कुनघाडा रै. ७ जुलैच्या रात्रीपासून आलेल्या संततधार पावसामुळे गडचिरोली-चामोर्शी महामार्गावर गडचिरोलीपासून १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या गोविंदपूर नाल्यावर तयार करण्यात आलेला रपटा काल ८ जुलै रोजी दुपारी ११ ते १२ वाजताच्या दरम्यान वाहून गेल्याने वाहतूक ठप्प पडली.
गडचिरोली-चामोर्शी मुख्य मार्गावरील वाहतुक दुसऱ्या दिवशी ९ जुलै रोजी गडचिरोली- चामोर्शी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुक ठप्पच आहे.
यामुळे वाहतुक कुनघाडा रै- गिलगांव पोटेगांव मार्गे सुरू आहे. त्यामुळे या मार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ वाढली आहे.
हेही वाचा: गडचिरोली: अति हिमवर्षा मूळे गोविंदपूर पुलानजिक रपटा गेला वाहून....
रपटाच वाहुन गेला असल्याने रपटा पुर्ववत करण्यास आणखी काही दिवसांचा कालावधी लागणार असल्याने अवजड वाहनांना अन्य मार्गाचा वापर करावा लागणार आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.