1. मेष : घरात काही बदल करून पहावेत. सामाजिक वजन वाढेल. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल.
2. वृषभ : वडीलांची नाराजी दूर करावी लागेल. आपल्या बुद्धिमत्तेचा योग्य वापर करावा लागेल.
3. मिथुन : वडिलोपार्जित कामे धनदायक ठरतील. व्यावसायिक बदल लक्षात घ्यावेत. मोहात अडकू नका.
4. कर्क : हट्टीपणे विचार कराल. स्वत:च्या इच्छेपुढे इतर गोष्टी दुय्यम वाटतील. झोपेची काहीशी तक्रार जाणवेल.
5. सिंह : कामात समाधानी असाल. नातेवाईक दुरावू शकतात. कामानिमित्त प्रवास घडेल.
6. कन्या : राजकारणी विचार मांडाल. नसते डावपेच खेळायला जाऊ नका. चिकाटीने कामे कराल.
7. तूळ : मनात उगाचच चिंता निर्माण होतील. काही गोष्टी तडजोडीने स्वीकाराव्या लागतील. व्यावसायिक गुंतवणूक करावी लागेल.
8. वृश्चिक : काही गोष्टींचे चिंतन करावे लागेल. भावंडांची समजूत काढावी लागेल. पराक्रमाला चांगला वाव मिळेल.
9. धनु : विचार करण्यात अधिक वेळ घालवाल. मोजक्याच शब्दांचा वापर करावा. सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा लागेल.
10. मकर : उगाचच दडपण घेऊन राहू नका. नवीन गोष्टी समजून घ्याव्यात. आपली वैचारिकता बदलून पहावी.
11. कुंभ : चिकाटी सोडून चालणार नाही. मनातील नकारात्मक विचार दूर सारावेत. अनावश्यक खर्च टाळावा.
12. मीन : मेहनतीला मागे हटू नका. तुमचे ज्ञान उपयोगी पडेल. व्यवसायातून चांगला आर्थिक लाभ संभवतो.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.