Chandrapur News: चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्या मधील टेंबुरवाही गावात दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास चक्क 16 वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. दिपाली बापूजी मरापे असे मृतक तरुणीचे नाव आणि वय -16 वर्ष रा. टेंबुरवाही असे आहे. दिपालीने उद्धव लचमा कुडसंगे (आजोबा) यांच्या राहते घरी दोरीला गळफास लाऊन आत्महत्या केली.
दिपालीचे सर्व परिवार मधील व्यक्ती शेतात कामा निमित्त गेले होते. गावकऱ्यांना प्रेत दिसताच त्यांनी तिच्या परिवाराला कळविले असता परिवार घरी पोहोचताच त्यांना धक्काच बसला.
गावातील नागरिकांनी पोलीस पाटीलास सांगितले आणि पोलीस पाटलांनी विरुर पोलीस स्टेशन ला लगेच हि माहिती दिली असता तात्काळ विरुर पुलिस स्टेशन पोलीस निरीक्षक श्रीकृष्णा तिवारी यांच्या मार्गदर्शनात मौका पंचनाम्या करिता पो. हवा वागदरकर, मपोशी सौजण्या, पोशी मडावी, होमगार्ड धनपालसिंग वाधावन यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. शव ताब्यात घेऊन शवविच्छेदना करीता उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे पाठविण्यात आले आहे .
दिपालीने आत्महत्या का केली असावी? कारण आत्महत्येचे नेमके कारण अजूनही अस्पष्ट असून पुढील तपास विरूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्रीकृष्णा तिवारी यांचा मार्गदर्शनात विरुर पोलीस करीत आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.