खरबी/ तुमसर: तुमसर येथिल जनता महाविद्यालयात १२ व्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थीनीने घरामागे दोनशे मिटर अंतरावर असलेल्या विहीरीत २५ जून रोजीच्या मध्यरात्री उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आष्टी येथे घडली. सदर घटना २६ जून रोजी उघडकीस आली. यशस्वी महेंद्र बोरकर (१९) रा. कबलेवाडा असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.
तुमसर तालूक्यातील कवलेवाडा येथील रहिवासी असलेल्या यशस्वी बोरकर ही विद्यार्थीनी आष्टी येथे आपल्या आत्याकडे बारा वर्षापासून वास्तव्यात होती. २५ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घरातील सर्व सदस्य गाड झोपेत असताना घरा मागिल दोनशे मिटर अंतरावर असलेल्या राजानंद गौपाले यांच्या विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना २६ जून रोजी सकाळी उघडकीस आली.
सदर विद्यार्थीनीने तुमसर येथिल जनता महाविद्यालयात १२ व्या वर्गात शिकत होती. ती आष्टी येथे आपल्या आत्याकडे राहात होती. मात्र आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. सदर घटनेची नोंद गोबरवाही पोलिस स्टेशन मध्ये करण्यात आली असून पूढील तपास ठाणेदार दिपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राजन गोडबे करीत आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.