Nagpur News: राज्यातील रत्नागिरी, मुंबई, पालघर आणि जळगावात डेल्टाप्लस व्हेरियंटचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे सरकार नव्याने निर्बंध लावण्याच्या तयारीत आहे. यातून विदर्भाला दिलासा मिळत असताना शनिवारी शहराने धास्ती घेतली.
मुंबईत प्रवास करून परतलेल्या एका तरुणीमुळे घरातील ५ जण आजारी पडल्याने डेल्टा प्लस शहरात दाखल तर झाला नाही ना, अशी भिती नागपूरकरांना बसली आहे. या कुटुंबातील सर्वांच्या घशातील स्त्रावाचे नमुने राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान (नीरी) येथे पाठविण्यात आले आहेत.
निरीत या नमुन्यांचे जिनोम सिक्वेसिंग केले जाणार आहे. मात्र त्याचा अहवाल येण्यासाठी तीन दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे. राज्यात कोरोनाच्या पहिल्या लाट ओसरल्यानंतर दुसऱ्या लाटेदरम्यान विषाणूने नवीन (म्यूटेंट) रूप धारण केले.
मेयोतून पाठवलेल्या नमुन्यांतून हे सिद्ध झाले होते. यानंतर कोरोनाच्या या लाटेने पाच हजार जीव घेतले. तर अवघ्या अडीच महिन्यात तीन लाखांवर बाधित झाले.
आता दुसरी लाट ओसरली असताना डेल्टा प्लस व्हेरियंटचे संकटामुळे मुंबईतून परतलेली तरुणी डेल्टा प्लसने तर बाधित नाही, ना याची भिती नागपूरकरांच्या मनात बसली आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.